Originally posted by: Utkarsha999
आजचा भाग छान आहे
सुरुवातीलाच परी आणि अगस्त्य चा गोड सिन होता
ज्यात अगस्त्य छोट्या परीला कोजागिरी पौर्णिमेच महत्व सांगत होता
परी : काका तु जागरण करणार आहेस का लक्ष्मी देवीच्या वेलकम साठी
अगस्त्य : नाही बाळा, कारण माझ्या आयुष्यात लक्ष्मी बनून तुझी काकी आली आहे ना आधीच 💞
सगळ छान चालू असताना मिठाचा खडा टाकायला सुलू आली मध्येच🤦♀
तिने श्रीला शिक्षा दिली जमिनीवर बसून जेवायचं मग अगस्त्यचा हट्ट माझ्या शेजारी माझ्या खुर्चीवर बसून जेव श्रीरे 🤭
सुलुचे टोमणे मग त्यावर अगस्त्यच चिडून तिला प्रतिउत्तर देण इतका वेळ शांत बसलेले मोठे भाऊ मग अगस्त्य ला आईचा अपमान करू नकोस असा सल्ला देतात त्यावर तो "श्रीचा अपमान होताना तुम्ही गप्प होतात तेव्हा हे तुम्ही आईला का नाही बोललात? श्री तिच्या आईवडिलांना सोडून इथे आलीये फक्त माझ्यासाठी त्यामूळे श्रीचा अपमान तो माझा अपमान! "
मध्येच शुभ्रा श्रीविषयी काहीतरी बोलते तेव्हा अगस्त्य तिला रागात - बास हा शुभ्रा गप्प बसायचं श्रीविषयी वेडवाकड ऐकून घेणार नाही मी!!
छोटी परी घाबरतेय हे बघून अगस्त्य शांत होतो आणि श्रीसोबत जमिनीवर जाऊन जेवायला बसतो सुलू चिडून निघून जाते श्री मागे जाणार तोच अगस्त्य तिला अडवतो- गप जेव श्रीरे .😜
बेडरुममध्ये नाक फुगवून बसलेल्या श्रीला अगस्त्य प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला रागात खूप काही बोलून जाते ( श्री जे काही बोलली ते अगदीच चुकीच नव्हत पण इतकी चिडचिड करण्याची गरज नव्हती कारण अगस्त्य काहीही चुकीच वागलाच नाहीये श्रीचा अपमान त्याला सहन नाही झाला यात काय चूक आहे 🤷♀)
श्री : तुझा काय संबंध माझी बाजू घेऊन बोलण्याचा कोण आहेस तु माझा? दुसर्यांना सांगतोस श्रीचा अपमान करू नका आणि मला बायकोचा मान न देऊन तु माझा रोज अपमान करतोस त्याच काय? जगासमोर चांगला नवरा असल्याच नाटक करायचं आणि खोलीत मैत्रीचं गाण गायच
माझ्यासाठी तुला तुझ्या आईशी भांडण करायची गरज नाहीये समजल 😡झोप गप आता आधीच माझ टाळक सटकलय
अगस्त्य : श्रीरे नात मैत्रीच असो किंवा प्रेमाच मी तुझा अपमान सहन करणार नाही मी भांडणार मग समोर कोणीही असो
मी जे केल ते तुझ्यासाठी केल मग तु का इतकी चिडचिड करतेस ग माझ्यावर 😥
मला नवरा बायको च्या नात्याचं गणित समजून घेण्यासाठी वेळ लागतोय त्यामुळे तुला त्रास होतोय कळतय मला पण श्रीरे मला फक्त थोडा वेळ दे मी जास्त वेळ नाही घेणार खरच
"आपल नात चिंचगुळाच्या आमटी सारख आहे मैत्रीची फोडणी छान बसलीये त्याला आता फक्त प्रेम नावाचा मीठ घालायच बाकी आहे आणि मला भीती वाटतेय घाई केली तर हे प्रमाण चुकेल म्हणून वेळ घेतोय मी श्रीरे तु समजून घेशील ना मला 😞"
31