ह्या webseries आणि movies चा कंटाळा आलाय आता ...एक तर चांगल काही येत नाहीये आणि काही चांगल वाटायला लागल तर त्यात येतो तो drugs वाला angle... का ? दुसर काही सुचत नाहीये का ?
south ची पण तीच बोंब ... त्यांना तो one man army वाले ' मसीहा ' च दाखवायचा आहे अजून ... काही बदलणार आहे का नाही ? ( माझे पप्पा आता नवीन south च्या मुव्हीज जे पहिले ५ मिनिट पाहून सगळी स्टोरी सांगतात )
आणि आमच्या मराठी बद्दल तर काय बोलायचं ती कुठे माती खातीये काय माहित ... इतिहासावर चित्रपट काढत सुटलेत ... बर काढा पण जरा चांगल्या प्रतीचा बनवा ना ... शेर शिवराज चा ट्रेलर पहिला , ट्रेलर मध्ये चित्रपटाची making स्पष्टपणे जाणवते किती खराब आहे ते , आणि ते प्रथमेश परब, आणि एक दोन डिरेक्टर आहेत ते फक्त आता p**n मुव्हीज काढायचे राहिलेत
मला वाटतं कि आपण आजकाल खूपच स्क्रीन बघतो . म्हणजे एकतर आपण एखाद्या ott प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेबशो बघतो नाहीतर युट्युब वर गाणी किंवा आणखीन काहीतरी किंवा मग टीव्ही वर मालिका वगैरे बघतो . आपण आपला सगळा मोकळा वेळ बहुदा स्क्रीन समोरच घालवतो त्यामुळे आपल्याला फारच कमी कन्टेन्ट मध्ये नावीन्य जाणवते. म्हणजे मी कितीतरी लोकांना रस्त्यावरून चालताना, कुठेतरी बसलेले अस्तानापण पण सेलफोनवर/आयपॅडवर काहीतरी बघतांना बघतो.
ह्याच्या अगोदर टीव्ही चॅनेल्सच्या बाबत पण असच म्हटलं जायचं, खूपच चॅनेल्स आहेत पण बघण्यालायक काहीच नाही .
1.2k