फुलवंती बघितला.
Positive गोष्टी- dialogues, sets, costumes, (जर खरच दिग्दर्शन स्नेहल तरडे ने केलं असेल तर..) दिग्दर्शक, वैशाली माडे च मदानमंजिरी गाणं, आर्या , राहुल देशपांडे ची गाणी👌👌
Negative गोष्टी.. अर्थातच प्राजक्ता माळी(pm चे फॅन्स आता माझा घरचा पत्ता शोधून मला मारायला येतील बहुतेक).
पण खरंच, तिला हा role झेपलाच नाहीये.
लांब, पल्लेदार वाक्य बोलताना तिची दमछाक होते, श्वास पूरा पडत नाही.
ठसकेबाज संवाद बोलताना तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.
काही ठिकाणी एडिटिंग चा पण गोंधळ आहे.
म्हणजे आपण कसं फ़ोटो काढताना एखादी pose देतो (साधारण 4 ते 5 seconds आपण त्याच pose मधे राहतो), आणि मग फोटो काढतो, तसं काही ठिकाणी नृत्याचे scenes मधे झालाय.
मदन मंजिरी गाण्याची choreography म्हनजे शाळेतील pt च्या तासातील कवायत वाटते.
गश्मीर ने का इतका underplay केलाय देव जाणे.
स्नेहल तरडे ही गश्मीर ची बायको का दाखवली? त्याच्या पेक्षा ती मोठी वाटते.
चिन्मयी सुमित , विभावरी देशपांडे आणि सुखदा( माझ्या नवऱ्याची खरी बायको) काही खास प्रभावी नाही वाटल्या.
Hrishikesh जोशी ला please यार कोणीतरी त्या पुणेरी रोल/tone मधून (कायमच ) बाहेर काढा रे.
वैभव मांगले ला आचार्य बनवलंय
Music मात्र छान आहे, गाणीही छान आहेत.
आपण मराठी आहोत, म्हणून अजून जास्त(negative) काही लिहीत नाही.
पण तरीही PM चा निर्मिती चा पहिला प्रयत्न आणि स्नेहल तरडे चा (पहिला) दिग्दर्शक प्रयत्न... साथ तर दिलीच पाहिजे ना आपण.👍👍👍
1k