Madgaon express Amazon var बघितला. अधून मधून बऱ्यापैकी हसायला येतं. Great नाही पण ठीक आहे. विशेष म्हणजे मिर्झापूर सिरीज मधला main villain दिव्येंदू शर्मा ईथे ३ हिरो पैकी एक आहे, त्याने विनोदी भूमिका पण चांगली केलीय, तसेच प्रतीक गांधीने देखील (जो हर्षद मेहता series मध्ये हिरो होता). पण विशेष उल्लेख छाया कदम ह्या आपल्या मराठमोळ्या actress चा करावा लागेल. इथे कांचन कोंबडी तर लापता लेडीज मध्ये स्टेशन वर चहाचा स्टॉल टाकून बसलेली वरून कडाक पण आतून प्रेमळ असलेली आजी ह्या दोन्ही भूमिका तिने कमी scope असून पण छान केल्या आहेत. हिंदी पिक्चरवल्याना हे रत्न कुठून सापडलं ? मराठी पिक्चरवल्यानी असे चांगले चांगले actors शोधून नाही काढले आणि कॅरेक्टर्स का अभावानेच लिहिले. असो. मराठी वा हिंदी I really hope she does well in future.
938