Originally posted by: RPRRR42
तस्करी सिरिज बघून झाली.पहिले दोन भाग बघितले होतेच.
आनंदाची गोष्ट म्हणजे याचा दुसरा भाग येण्याचा चानस राईटरने ठेवलेला नाही.त्यामुळे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या

आता जरा सिरिजकडे.
ओटीटीवरच्यि सिरिजमध्ये असणारा थरार,सस्पेन्स पाहायचा असेल तर शेवटचे दौन भाग बघा.
कारण तिथे राईटर आणि डिरेक्टर जागे झाले आहेत की आपण सिरिज बनवत आहोत.लोकांना आता काहीतरी सनसनाटी दाखवायला हव.
म्हणून मग सगळ कस पटापट होत.म्हणजे इमानदार ऑफिसरचा म्रुत्यु.गद्दारांचा खरा चेहरा.मग हीरोची हीरोगिरी वगैरे वगैरे.
या सगळ्यात ज्या ज्या देशांमध्ये हा थरार होत़,तिथल्या सरकारांना काहीहघ माहिती नाही.तिथले आपलेच लोक कारवाई करतात.सैन्य त्यांच पण डोक आपल्या हीरोच.
नीरज पांडे डिरेक्टर आहे,पैसा आहे,नेटफ्लिक्स सारखा प्लँटफॉर्म आहे मग वेगळा विषय म्हणून कस्टम घेऊ आणि काढू एक सिरिज म्हणून काढली आहे.
सात एपिसोड्सपैकी पहिले पाच अत्यंत स्लो आणि बोअर,फिल्मी,आहेत.
दर पाच मिनिटांनी एखाद प्लेन टेक ऑफ होताना किंवा लँड होताना दाखवायलाच पाहि हा या सिरिजचा अलिखित नियम आहे.
मुंबई एअरपोर्ट म्हणजे नँशनल पार्क असल्यासारखे लोक चालतात.करप्ट कस्टम अधिकारी माल जाऊन देतात .मग अचानक आपल्या सरकारला जाणीव होते की भरपूर स्मगलिंगचा माल भारतात येतो,इलेक्शन्स आली आहेत,वगैरे .मग एक कस्टम ऑफिसर येतो ,तो आणखी तीन सस्पेंड झालेल्यांना हायरकरतो.ते आणखी काहींना.अशी टीम होते।
चौधरी सिंडिकेट या मूळ स्मगलिंग कँपनीला संपवण हा उद्देश.आणि मग कशा जक एक गोष्टी समोर येतात ,मग सत्यमेव जयते आणि बुराई का अंत.
अँक्टिंग डिपार्टमेंट.
सबकुछ इम्रान हाश्मी आहे.हीरो पण तोच,नँरेटर पण तोच.तो तो आणि तो.
अम्रुता मला नाही आवडत एवढी अँक्टिंग मध्ये.ठीकठाक.
झोया अफरोज-कचकडी बाहूली.सिरीजसाठघ ठीक.
सगळ्यात वाईट कँरँक्टरायझेशन कुणाच असेल तर ते शरद केळकरच.
त्याला शेवटच्या दीड भागामध्ये काम आहे.
पहिल्य भागांमध्ये अक्षरशः मॉडेलस्टाईल चालण,फारफारतर दोन मिनीट फोनवरती बोलण.बास
म्हणजे झोयासाठी फूल तिसरा एपिसोड आहे आणि शरदसारख्या कलाकाराची तो व्हिलन बनण्याची स्टोरी पाच मिनिटात दाखवली आहे.फोनवर बोलण हेच त्याच काम आहे.
त्याला मेन स्ट्रीममध्ये सहज काम देता आल असत.फँमिली मँनमध्ये निदान तो.कँमिओ होता.गथे मेन व्हिलन असूनही काम अगदीच किरकोळ आहे.
तो असे रोल्स का एक्सेप्ट करतो त्याच त्यालाच माहीत.
बाकी सगळ ठीकठाक.
मी सांगितल तस ,थरार आणि ट्विस्टस बघायचे असतील तर.शेवटचे दोन एपिसोड्स बघा.
बाकी सगळा आनंदच आहे.
1.4k