Originally posted by: mishkil88
आधी लेखकाला विसर पडला होता की संजना सई- मंदिरा बरोबर car मधून बरोबर येत होती, पण वाड्यावर त्या दोघीच पोचल्या. आता त्याला विसर पडला की दिनेश आणि family already वाटेत दाखवले होते previous episode मधे. आता ते परत घरी झोपलेले दाखवले next episode मधे.
काय गोंधळ घातला आहे या लोकांनी.... कधी दिनेश प्रभा मामी कार मध्ये दाखवतात तर कधी झोपलेले. मला वाटला रेस्ट हाऊस मध्ये असतील पण कोल्हापूर नाशिक इतका पण लांब नाही की एक रात्र थांबावे लागेल....
साखरपुडा करताहेत यांचा तर आता या दोघी मुलींना आजीची आठवण झाली आणि रडत बसल्या आहेत. मुर्खपणा करून पळून गेलात तेव्हा नाही वाटलं काही. त्या सईचा रडका चेहरा आणि आवाज किती irritating आहे... ती मंदिरा शहाणी म्हणते साखरपुडा उरकून घेऊ मग आजीला भेटायला जाऊया 😁😁😁 FF करण्या लायक....
या उलट शालिनी बरोबर किचन मधला मुलींचा सीन मस्त होता. मंजुळा चे बोलणे मजेशीर असते... ओव्या ला ववा म्हणते 😁 मग उमा माठ भाजीला पाला म्हणते तर मंजुळा म्हणते गुरांना घालायचा पाला 😂😂
उमा बोलते ही ओव्या ला ववा म्हणु शकते तर मी भाजीला पाला म्हणाले तर काय झालं 😀
मंजुळा बोलते या पोरींना काहीच येत नाही 😁😁😁
छोटासा सीन पण मस्तं होता...