Originally posted by: iluvusakshi
काल PRINCESS DIANA ला जाऊन 29 वर्ष झाली.😢😢
मला फार फार आवडायची.
एक वेगळाच aura होता तिचा, अजूनही आहे.
स्मिता पाटील, किंवा diana किंवा अजून अश्या baraych जणी असतील, ज्यांनी इतक्या कमी आयुष्यात इतका काहीं करून ठेवलंय(अर्थात चांगलं) की लोकांना अजूनही त्यांची आठवण येते.
हो डायना खूप प्रसिद्ध होती. मुळातच बंडखोर प्रवृत्ती असल्याने लफडेबाज नवरा आणि रॉयल फॅमिलीचे orthodox नियम झुगारत पॅलेस मधून बाहेर पडली social work चालू ठेवले. आणि बरेच बोल्ड डिसिजन घेतले. दिसायला सुंदर असल्याने आणि social work मुळे जगप्रसिद्ध होतीच.
पण तिची लग्नानंतर, विशेष करून डिव्होर्स नंतर बरीच अफेअर्स झाली. एका पाकिस्तानी डॉक्टरशी 2 वर्ष अफेयर होते, त्या आधी ब्रिटन मध्ये काही अफेअर्स झाली. शेवटी Dodi ह्या Egyptian श्रीमंत businessman बरोबर फ्रान्स मध्ये सुट्टी घालवत असताना papparazi ना चुकवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरला गाडी खूप फास्ट घ्यायला सांगितली आणि त्यातच अंत झाला.
ह्यावर movies आणि series आहेत. रॉयल फॅमिलीवर बनवलेली The Crown ही सीरिज फारच छान आहे. खूपच गाजली.
1.5k