मी अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा movie पाहिला.
ते ही चक्क आज, sunday ला, सुट्टी च्या दिवशी.
ते ही चक्क प्लाझा ला ,दादर ला.
लोकहो, माझं अभिनंदन करा
Ok तर आता review देते.
माझे ना जरा 2 reviews आहेत.
मुक्ता ची fan असल्यामुळें obviously मी जे काही बोलणार, ते चांगलाच बोलणार.
संवाद, लेखन(👌👌) आणि pace, खुप छान आहेत.
भराभर गोष्टी घडत राहतात, movie कुठेही रेंगाळत नाही. उसंतच मिळत नाही आपल्याला. सतत आपण हसत असतो. Dialogues👌👌
Emotional dramaa फार म्हणावा, तर तसाही नाही.
अभिनय ही 👌👌👌👌👌👌👌(total 7 कलाकार आहेत ना, म्हणुन)😊.
आता जरा negative..
याचा pace हा इतका आहे, की अक्षरशः आपली दमछाक होते.
कोणचं affair कोणाशी आहे, हे कळतच नाही. सॉलिड गुंता आहे.
आपल्याला वाटत, हा बाबा, ह्याचं आणि हीच affair आहे, तर तो (आणि ती ही) पुढल्या काही क्षणात भलत्याच बरोबर असतात.
भले मोठे, मोठे संवाद ही अजून एक (जरी ते कितीही चांगले , relatable असले तरीही).
2 ते 2.15 तासांचा आहे movie.
शेवटची 5 ते 10 minutes एकदम फुस्स आहेत.
पण बाकी अख्खा movie एक smile तुमच्या चेहऱ्यावर सतत असतं.😊
नात्यावर स्पष्टपणे भाष्य करणारा, म्हटलं तर हळुवार , किंवा परखडपणे बोलणारा, शेवटी ज्याला त्याला आपण कुठे stand करतो याची जाणीव करून देणारा असा movie आहे.
40 शीतले लोक या परिस्थितिला जास्त better way मध्ये relate करू शकतील.
Overall movie is ok.
3.5/ 5 माझ्याकडून rating.
1k