Originally posted by: iluvusakshi
What's app forwarded...
वाढदिवसाच्या शुभेच्छा माधुरी...
वपु म्हणतात .....सौंदर्य...
'स्त्री? ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य??
तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!?
'का??
'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही,
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते....
असो...हा एक मिस्कील विचार झाला.
सुंदर दिसण्यासाठी साठी,माणसाने सुंदर असणे महत्त्वाचे आहे...मुळात सुंदर दिसणं हा स्त्रीचा गुणाधार नसून केवळ एक विशेषण आहे.पण सुंदर काय आहे, याबाबत आपण साचेबद्ध होत गेलो आहोत. अगदी अमुक एक सुंदर आहे, असा मारा आपल्या मनावर होत राहतो.पण खरं सौन्दर्य कसं असतं आरशासमोर चेहरा फक्त स्वच्छ धुवून उभ्या राहा. स्वतःला सांगा, की 'मी सुंदर आहे' आणि बघा कसे वाटते ते! काही सेकंद का होईना, चांगले वाटले, तर ही गोष्ट कायमसाठी लक्षात ठेवा. कोणतीच बाह्य गोष्ट तुम्हाला सुंदर करू शकत नाही. स्वतःच्या शरीराची, मनाची, स्वास्थ्याची काळजी घ्या. व्यायाम करा, पौष्टिक अन्न खा. आपल्या माणसांवर प्रेम करा, स्वतःसाठी थोडा वेळ काढा, ज्या गोष्टी तुम्हाला आतून आनंद देतात त्या करा. निरोगी, स्वस्थ राहणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, त्वचेची, आरोग्याची, स्वतःची काळजी घेणे या प्राथमिक गोष्टी आहे. या स्त्री आणि पुरुष अशा दोघांसाठीही आहेत.
अशीच एक आमची आईडल आहे,'माधुरी दीक्षित नेने '
तीच सुंदर असणं तिच्या वागण्यातून, दिसण्यातून, कामातून दिसतं. चांगल्या चेहऱ्याबरोबरच तीच कर्तृत्व ही चांगलं आहे आणि ते महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. तीन आपल्या अभिनय आणि कामाला महत्त्व दिलं . चांगल्या चेहऱ्याबरोबर चांगला अभिनयाची जोड म्हणूनच आपण माधुरीला ओळखतो .
माधुरी दीक्षित अशीच मनात ठसलेलं सौन्दर्य.....एक यशस्वी अभिनेत्री ,यशस्वी पत्नी ,आणि आपल्या मुलांची आई ,तीचसुसंस्कृतणा,एक आकर्षकस्वच्छ व्यक्तिमत्त्व,तीच स्मितहास्य ,तीचचिरतारुण्य ....एक चांगल्या स्वभावाची व्यक्ती ....तिच्या बद्दल म्हणूनच प्रचंड आदर आहे आणि कौतूक ही...
तीच मराठमोळं दिसणं आणि ते तीन जपणं....अजून आम्हाला भावतं....असंच एक स्वर्गीय सौन्दर्य आचार्य अत्रेंच्या शब्दात सांगायचं तर..
स्वर्गातल्या पर्य़ाना, कि वस्त्रगाळ करुनी
कमनीय देह विधिने, रचिला तिचा छबेला
लावण्य काय सारे, उकळोनी वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा, भरला गमेचि बुधला
डौलात चालता ती, हत्ती वनात झुरती
रस्त्यात गुंड जमती, तिज अन पहावयाला
ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला
छातीत इष्क भाला, की आरपार गेला ...
शायर इमाम बख़्श नासिख़ आपल्या शेर मधून म्हणतात...
तेरी सूरत से किसी की नहीं मिलती सूरत
हम जहाँ में तिरी तस्वीर लिए फिरते हैं ..
ती कधी तसबीरीतून भेटते तर कधी ....स्वप्न नगरीतून कवियत्री संगीता जोशी सुरेश भटांच्या या कविते बद्दल म्हणतात... पूर्णिमेचे चांदणे वेणीत माळून, अधिऱ्या आठवांची आरती हृदयात घेऊन ती येते, तर कधी मराठमोळ्या रूपात गीतगंगेच्या तटावर घागर घेऊन येते! कुठल्याही रूपात येवो, आम्ही तिची उत्कंठेने वाट पाहत असतो...
आमच्या बकेट लिस्ट मध्ये अशीच एक अपूर्ण इच्छा आहे....ती प्रत्यक्ष आम्हाला भेटली तर .....….तर....त्या भेटीत सुरेश भटांची जशी त्यांच्या या कवितेतून अवस्था झाली तशीच होईल..आम्ही ही गोंधळून जाऊ काही सुचणार नाही.....
तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!..
कधीतरी ती नुसतीच हवेच्या झोतासारखी अंगावरून निघून जाते..भट लिहितात,
कोण जाणे कोण हे जवळून गेले
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले..
‘ती’च होती ती. पण मग भेटली का नाही?
मला टाळत तर नाही ना?
तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते
मजपाशी पण तुझियासाठी केवळ गाणे होते..!(कवी सुरेश भट)
म्हणूनच मला नेहमी वाटतं माधुरी....
माधुरी तू इतकं सुंदर
असायला नको होतंस
किमान माझ्या नजरेत
तरी ठसायला नको होतंस ....
माधुरी तू इतकं सुंदर
असायला नको होतंस
माधुरी तुझ्या कडे पाहून
जग किती सुंदर ते कळतं...
शेवटी काय मित्रानो आजच का हा योग जुळून आला कारण.....
ये तो इक रस्म-ए-जहाँ है जो अदा होती है ...
वर्ना चांद की कहाँ सालगिरह होती है ...
आमच्या मनात ठसलेल्या माधुरी दीक्षित यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...
लेख: श्रीकांत
850