Originally posted by: iluvusakshi
26/7 चा विषय निघालाच आहे, तर आपण बोलूया का इकडे त्याबद्दल??
मी माझा अनुभव सांगते.
मी नेमकी त्या दिवशी दादर ला गेले होते.
साधारण दुपारच्या सुमारास जी ट्रेन मी पकडली होती, ती sion ला बंद म्हणजे absolute बंद झाली.
कारण ट्रॅक वर पाणी होता आणि trains जातच नव्हत्या पुढे.
मग ती रात्र म्हणजे 26 ची रात्र, मी आणि इतर बायका along with some men in gents compartment, ट्रेन मधेच काढली.
ट्रेन चे light आणि fans बंद होते.
दुसऱ्या दिवशी सायन ला त्याच घाण पाण्यात उतरून(इतरांच्या मदतीने), तर काही लोक बोलले हे चुनभट्टी कडे जातो रोड.
मग परत हळू हळू मागे फिरत sion ला साधना high school ला पोचले.
तो दिवस आणि ती रात्र तिकडेच राहिले.
(शाळेच्या लोकांनी आम्हाला हॉल मध्ये सतरंजी वर झोपायला दिला, आणि तिकडे एक bank पण आहे, त्यांचा पण staff होता, त्यांनी भात दिला दोन्ही वेळेस).
मग 28 ला ठाणे पर्यंत train ने आले.
आणि पुढे ठाणे ते डोंबिवली 250 per seat या प्रमाणे रिक्षा ने घरी आले.
घरी जातांना biscuits आणि bread घेऊन गेले.
त्या वेळी माझ्याकडे 1100 हा नोकिया चा बेसिक phone होता, तो पूर्णपणे discharge झाला होता.
घरी गेले, तर light नव्हते.
संध्याकाळी कधीतरी light आले,माहीत नाही.
(कारण मी अक्षरशः ताणून दिली होती).
816