Originally posted by: iluvusakshi
Forwarded as received:-
अग्गबाई सासुबाईं या मालिकेच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक यांनी ज्वलंत अशा विधवा स्त्रियांच्या प्रश्नाला हात घालण्याच धाडस दाखवल त्याबद्दल त्यांच अभिनंदन..आसावरीच्या माध्यमातून एका मातृवत्सल आईला दाखवल.शुभ्राच्या माध्यमातून आधुनिक विचारांची सून जी आपल्या सासूला सन्मानाच जीवन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. पुरुष दिर्घकाळ विधूर राहू शकत नाहीत ऐव्हाना सत्तरी ओलांडल्यावरही लग्न करणारे पुरुष समाजात सन्मानाने वावरतात.परंतु तिशी चाळीशीत विधवा झालेल्या स्त्रिला एकटीला जीवन जगायला समाज भाग पाडतो.तिलाही भावना आहेत याचा मुळीच विचार कुणी करत नाही. काही ठिकाणी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाते. तरीही ती जगते.
आसावरी अशाच स्त्रियांच प्रतिक आहे.आतापर्यंत झाल ते ठिकच .परंतु सोहमच्या माध्यमातून जेकाही दाखवल जातय ते अशोभनीय आहे.
लेखक व दिग्दर्शक यांना यातून काय साध्य करायच हेच कळत नाही ? का इतर मालिकाप्रमाणे उगाचच ओढून ताणून एपिसोड वाढण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे.
My two cents-
ह्या सिरीयल मध्ये सध्या जे काही सुरू आहे ते पाहता, लेखक - दिग्दर्शकाच्या हेतू विषयी शंका येते.. खरंच त्यांना विधवा स्त्रियांचे प्रश्न ह्या माध्यमातून मांडायचे होते का?
मुख्य म्हणजे किती विधवा/ अविवाहित/ परित्यक्ता स्त्रिया आसावरीसारख्या बावळट असतात? उलट अशा कितीतरी स्त्रिया आपल्या पाहण्यात आहेत, ज्या खमकेपणे परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःचा सन्मान जपून स्वाभिमानाने आयुष्य घालवतात, मग त्या शहरी असोत वा ग्रामीण, सुशिक्षित असोत वा अशिक्षित ....
प्रत्येक वेळी एकट्या बाईला किंवा पुरुषाला कोणाची तरी गरज/ आधार लागतो असं कुठे असतं? माझ्या माहितीत अशा अनेक एकट्या बायका आहेत ज्या त्यांच्या आयुष्यात आणि करीयर मध्ये यशस्वी आहेत. तसेच पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर मुलांना वाढवणारे पुरुषही आहेत... हे टीव्ही वाले लोक कोणत्या जमान्यात वावरतात !
अशा so called कौटुंबिक मालिकांपेक्षा ऐतिहासिक मालिका परवडल्या... निदान अजून तरी कोणी 'संजय लीला भन्साळी' टीव्हीवर नाहीये तोपर्यंत तरी 😉...
Edited by ana1003 - 5 years ago
31