Originally posted by: iluvusakshi
मृण्मयी चे असे असले projects बघून असा वाटतं की हिच्यापेक्षा ती गौतमी बरी.
(दोघेही तशा त्रासदयकच आहेत, पण तरीही...दगडापेक्षा वीट मऊ...)
खर सांगायच तर मृण्मयी मला जेव्हा ती एका पेक्षा एक मध्ये होती तेव्हापासून च आवडते, काम पण छान करते. सोनाली, अमृता,सई आणि मृण्मयी ह्या मराठी मधील अश्या काही अभिनेत्री आहेत की ज्या कोणत्याही प्रकारच्या भूमिका साकारु शकतात ( मग ती शहरातील मुलगी, गावातील मुलगी असु देत किंवा मग ऐतिहासिक भूमिका असुदे ) आणि ते त्यांनी दाखवून पण दिल आहे.
पण जेव्हा मृण्मयी ने मन फकिरा डिरेक्ट केला तेव्हापासून ती track चुकल्या सारखी वाटते. मनाच्या श्लोक कडुन पण फार काही अपेक्षा ठेवाव्यात अस वाटत नाही. ती भविष्यात काही चांगले करील ही अपेक्षा 😅
1.2k