कुठेतरी असं वाचलं की samantha ने खूप मेहनत घेतली आहे ह्या रोल साठी मात्र तिचे काही सीन्स खूप disturbing आहेत. म्हणजे violence अजून वरच्या पातळी वर गेला असेल.Originally posted by: iluvusakshi
@RR.....तुझ्यासाठी..
काय आहे स्टोरी?
द फॅमिली मॅन 2 ही श्रीकांत तिवारी ह्या इंटेलिजन्स ऑफिसरच्या आयुष्याभोवती फिरत राहते. नव्या सिझनमध्ये तो नव्या नोकरीला लागलेला आहे. 'टास्क'ची नोकरी सोडून त्यानं आता एका कार्पोरेट कंपनीत जॉब सुरु केला आहे. Don't be a minimum guy चा त्याला तिथेही उबग
आला आहे. शेवटी तो पुन्हा 'टास्क' ज्वाईन करतो आणि सुरु होता पुन्हा एकदा मांजर आणि उंदराचा खेळ. नव्या सिझनमध्ये एलटीटीईशी संबंधीत कथानक आहे. श्रीलंकन तमिळ बंडखोर आणि त्यांना ISI ची फूस या पार्श्वभूमीवर कथानक उलगडत जातं. लहान मोठ्या घटनांमधून ते इंट्रेस्टिंग होत जातं. चेन्नई, मुंबई, उत्तर श्रीलंका, लंडन अशा वेगवेगळ्या शहरातून गोष्ट फिरत रहाते. तमिळ बंडखोर आणि आयएसआयचे एजंट एका भारतविरोधी मोठ्या मिशनवर आहेत, ते मिशन मोडून काढण्यासाठी श्रीकांत तिवारी, जेके पुन्हा एकदा मैदानात आहेत. सोबतच श्रीकांतच्या वैयक्तिक आयुष्याचे वाजलेले बाराही सिरीजमध्ये समांतर घडत रहातात.
मनोज वाजपेयी की सामंथा?
दुसऱ्या सिझनमध्ये जेवढी श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयीबद्दल उत्सुकता आहेत तेवढीच साऊथ स्टार सामंथाबद्दलही आहे. ती पहिल्या सिझनमध्ये नव्हती. दुसऱ्या सिझनमध्ये मात्र तिची दमदार भूमिका आहे. तमिळ बंडखोराच्या भूमिकेत सामंथानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या सिझनमध्ये मनोज वाजपेयीनं साकारलेल्या श्रीकांत तिवारीपेक्षा सामंथा अक्निेनीनं साकारलेली राजी अधिक
भारदस्त आहे. श्रीकांत तिवारीच्या आयुष्यापेक्षा आपण सिरीज पहाताना राजीच्या आयुष्यात जास्त गुंतत जातोत. कारण त्या आयुष्याला डार्क शेड जास्त आहेत. त्यातच सामंथानं ती इतकी मजबुतपणे साकारलीय की, अख्खा सिझन तिनं खाऊन टाकला आहे. ज्या ज्या वेळेस सामंथा स्क्रिनवर येते त्या त्या वेळेस आपली नजर स्क्रिनवरुन हटत नाही.
1.3k