मी 3 अतिशय वाईट, फालतु movies पाहिले.
1. महाराष्ट्र files. या मंगेश देसाई ला अचानक इतकं महत्व कसं काय प्राप्त झालंय? हा काय स्वतः ला (गरिबांचा) मसिहा वगैरे समजायला लागलंय की काय?
शेतकरी , शेती, आत्महत्या, जमिनी बळकावन हा विषय आता पार चावून चोथा झालाय, आणि खरं सांगू का, त्याच त्याच कलाकार ना बघून आता भयंकर bore झालंय.
2. गाढवाच लग्न( you tube वर आहे) . मकरंद अनासपुरे इतका पकावू आहे न. त्याचा तो 'अगो बाबो' वाला tone इतका irritate करतो ना अक्खा movie भर. त्यात त्याची ती करवदणारी बायको. काही sense च नाहीये.
3. VIBE. कुणाल खेमू डायरेक्टर आहे. Priti zinta ला त्या james bond movie मध्ये कशी madm X असते, तशी ईकडे तिला madam H बनवली आहे. वाह्यात आणि शेंडा बुडखा नसलेला मूवी आहे.
यावर उतारा म्हणून आता मी 'अडकित्ता' बघणार आहे.
736