Originally posted by: Prateekshaa29
Just saw ydays episode aaji saying jee mulgi aaichya golya badalte ...........I m so surprised no one thinks why would a daughter do this to her mother.ajji said in that 1st episode fire cha dhaak dakhvun killedar chya gharat shirli still no one not even sayli thinks why priya is doing it.
Only priya is the one with brains everyone dumb.🙄
तरी पूर्णा आजी एकदा म्हणाली की तिला तन्वी प्रतिमा आणि रविराजाची मुलगी वाटत नाही. अर्थात ते संशय म्हणून नव्हे, तन्वीवरचा राग म्हणून म्हणाली हे त्यानंतरच्या भागांतून स्पष्ट झालं.
मला वाटतं या सगळ्यांसाठी तन्वी एक खूप वाईट मुलगी आहे, किल्लेदारांची वाईट मुलगी. अर्जुन सुद्धा म्हणाला की तन्वी आणि तिच्या आईबाबांमध्ये किती फरक आहे. मुलं आईवडिलांपेक्षा वेगळी असू शकतात. त्याने अस्मितेचं उदाहरण दिलं. त्याने तो त्याच्या वडिलांसारखा कसा नाही हेही सांगितलं.
मान्य, अस्मिता आणि अर्जुन त्यांच्या आईवडिलांशी असं वागले नाहीत, पण मुद्दा हा आहे की मूल आणि आईवडिल यांच्यात खूप फरक असू शकतो, मुलं आईवडिलांना असा त्रास देऊ शकतात. हे शक्य आहे.
अश्विन याचं उत्तम उदाहरण आहे. त्याने चुकीची औषधं दिली नाही, तरी त्याच्या वागण्यामुळे त्याच्या आईवडिलांना त्रास झाला हे खरंय. त्याने संपत्तीतला वाटा मागितला हे एक उदाहरण. तरी तो कल्पना आणि प्रताप यांचा खरा मुलगा आहे.
मला वाटतं हे किती हळूहळू दाखवतायत किंवा सुभेदार मूर्ख आहेत का असं वाटत असलं तरी बरोबर आहे. जर त्यांना तन्वी खरंच प्रतिमेची मुलगी आहे का असा संशय आला असता तर ते अचानक असं कसं, आणि खोटं वाटलं असतं. So this time, for a change, TTM has passed the logic test. 🥳
त्यांनी ही चूक सायलीच्या बाबतीत केली. ती इतके दिवस त्यांच्या एवढ्या चुकांकडे दुर्लक्ष करायची, “माझे आईबाबा पैशांसाठी खोटं का बोलतील? माझी आई खेळात चीटिंग का करेल? माझ्या आईला पसारा कसा आवडेल?” असे प्रश्न तिला पडले नाही, तिचा त्यांच्यावर विश्वास होता, पण एके दिवशी त्यांच्या एका चुकीवरून अचानक १८०° फिरून म्हणाली की हे तिचे आईबाबा नाही, कारण तिचं मन तिला सांगतंय. वर म्हणाली "राहून राहून मला असं वाटतंय. यांच्याबद्दल तो ओलावा जाणवत नाहीये." Lol मालिकेत असं काही दाखवलं नव्हतं की सायलीला असं राहून राहून बरेच दिवस वाटतंय, ओलावा जाणवत नाहीये. Abrupt change in Sayli, lack of continuity. अर्जुनला हळूहळू, विचार करत करत संशय आला, ते खरं वाटलं. सायलीचा संशय अचानक आला असं वाटलं.
1.5k