-:🤣:- आहेत कुठल्या भाषेत एवढी विशेषणं ? -:🤣:-|| लुसलुशीत, खुसखुशीत, भुसभुशीत, घसघशीत, || रसरशीत, ठसठशीत, कुरकुरीत, चुरचुरीत, झणझणीत, || सणसणीत, ढणढणीत, ठणठणीत, दणदणीत, चुणचुणीत, || टुणटुणीत, चमचमीत, दमदमीत, खमखमीत, झगझगीत, || झगमगीत, खणखणीत, रखरखीत, चटमटीत, चटपटीत, || खुटखुटीत, चरचरीत, गरगरीत, चकचकीत, गुटगुटीत, || सुटसुटीत, तुकतुकीत, बटबटीत, पचपचीत, खरखरीत, || खरमरीत, तरतरीत, सरसरीत, सरबरीत, करकरीत, || झिरझिरीत, फडफडीत, शिडशिडीत, मिळमिळीत, || गिळगिळीत, बुळबुळीत, झुळझुळीत, कुळकुळीत, || तुळतुळीत, जळजळीत, टळटळीत, ढळढळीत, || डळमळीत, गुळगुळीत, गुळमुळीत. -:🔸 ह्या शब्दांना इंग्रजी, हिंदी अथवा कुठल्याही :----------- -:🔸 भाषेत प्रतिशब्द शोधून दाखवावा :------------ -:🔹 थोडी गम्मत :------------ || 'मॅक्सिन बर्नसन' हा एक अमेरिकन भाषा तज्ज्ञ || मराठीबद्दल त्यांनी लिहिले आहे कि...|| ही मराठी भाषा खूप छान आहे, पण जीव घाबरा करणारी || आहे. मराठी भाषेत बाळबोध लिपी पासूनच हिंसेचे || बाळकडू पाजले जाते. -:🔹 उदा० :------------ || अक्षरांचे पोट फोडणे, पाय मोडणे; || इतिहासात तर 'ध' चा 'मा' सुद्धा केला जातो. || यांच्या सामाजिक व्यवहारातही उघड उघड हिंसाचार || दिसतो. :*|| नाक दाबले, तर तोंड उघडणे. || अमक्याचे खापर, तमक्याच्या माथी फोडणे, || धारेवर धरणे, पाठीत खंजीर खुपसणे, || बिन पाण्याने हजामत करणे, रक्त आटवणे, पाय ओढणे, || पोटावर पाय देणे, कान उपटणे, डोक्यावर मिरे वाटणे. || इत्यादी, इत्यादी... -:🔹 ही मराठी माणसे स्वत:बद्दलही हिंसक असतात. -:🔹 म्हणजे... 🤣😀😂-:🔹 झोपेतून उठल्यावर :------------ || अंग मोडतात, बोटे मोडतात, घसाफोड करतात, || तोंड फाटेस्तोवर बोलतात, घर डोक्यावर घेतात, || डोक्यात राख घालतात. -:🔹 आणि कांहीही खातात :------------ || मार खातात, बोलणी खातात, डोके खातात, वेळ खातात, || लिहितांना काना-मात्रा वेलांट्या खाऊन टाकतात. आणि || कांही जण, तर पैसेही खातात... 🤪 🤪 -:🔹 यांच्या शरीर शास्त्राच्या कल्पना तर काय :-------------:🔹 विचित्र आहेत पाहा 😀 😅|| यांचे हातपाय गळतात, काळजाचे पाणी होते, || तोंडचे पाणी पळते. || आता सांगा, परकियांना ही भाषा येणार कशी ? || पण माझ्यावर या भाषेने कृपा केली आणि मला ती || चांगली यायला लागली. -:😂:- आता "माझा जीव भांड्यात पडला" -:😂:-
One of my Marathi friends shared this as today is marathi bhasha din. 🙏🤣
Take it on lighter note 🙏
1.4k