ALmost सगळ्या reality शो मधे हेच होतंय.
परिस्थिती हलाखीची आहे, त्यावर मी कशी मात केली, खूप struggle केला, सतत रडारड हे सगळं दाखवून channel आपला trp वाढवत.
गौरी पगारे ही उर्मिला धनगर, राधा खुडे यांच्या category मधली आहे.
फक्त टिपेची आवाजातील गाणी ती चांगली गाते.
सॉफ्ट गाणी ती (may be) नाही गाऊ शकत.
जसा जयेश खरे..तो फक्त वरच्या पट्टीतली गाणीच चांगली गातो.
(आदर्श शिंदे सारखा).
सुलोचना चव्हाण यांनी आयुष्यभर लावण्या गायल्या.(ज्या अत्यंत गाजल्या).अजूनही लोक आवडीने ऐकतात. आणि आस्वाद घेतात.
माणिकबाई यांनी सुद्धा mostly सोज्वळ categoey म्हणता येईल अशीच गाणी गायली.
प्रत्येकाच्या आवाजाची जातकुळी वेगळी आहे.
Hrishikesh हा साधारणपणे पुढे प्रथमेश लाघते सारखा होणार आहे.
तो सार्थक त्या मेश्राम सारखा किर्तनकार होणार आहे.
अश्या मुलांना मुळातच स्पर्धेत का उतरवतात?
त्यांची आवाज, गाण्याची पद्धत ठरलेली आहे.
देवांश किती लहान आहे.
या वेळच्या पर्वाचा वयोगट चुकीचा आहे मुळातच.
जो मुलगा/मुलगी 15 /14 वर्षाचा आहे, त्याने जवळपास 7 ते 8 वर्ष गाण शिकल आहेत.
आणि देवांश, ऋचा, हिमांशू हे मुळातच 6, 7 वर्षाच्या आसपास आहेत.
यांच्यात स्पर्धा कशी काय होणार?
आई, वडील सुद्धा zee सारखा channel मिळतंय, म्हणून आपल्या मुलांना या स्पर्धेत उतरवतात का?
Anyways, sm वर बरीच चर्चा आहे, की, गौरी कशी deserving winner नाहीये.
31