मंजुळा ची तब्येत फारच खालावली, म्हणून lady dr आली वाड्यावर.
512 रुपये ,50पैसे ची औषधं लिहून दिली तिने मंजुळा साठी.
हे सगळे पैसे महादेव काका ने दिले.
त्याला आता उपरती झाली की ज्या अर्थी साक्षात गणेशाने मंजुळा ला वाचवली आणि पुन्हा वाड्यावर आणली, त्या अर्थी ही आपलीच असणार, म्हणजे अग्निहोत्री.
Dr. औषध लिहून देताना patient चा नाव विचारतात, तेव्हा तो ,मंजुळा अग्निहोत्री अस संपुर्ण म्हणून सांगतो.
आणि नंतर तिच्या साठी , स्वतः साठी आणि शालिनी साठी, भात, मेतकूट आणि लिंबाचा लोणचं आणतो जेवायला. मंजुळा च्या डोक्यावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवतो(104 ताप असतो ना बिचारीला).
तर....हे सगळं इतकं detail मध्ये सांगायचं कारण अस की, dr जेव्हा औषधं लिहून देते, तेव्हा ती REYNOLDS च्या पेन ने लिहिते.😊
अहाहा.... काय मस्त होतं ते पेन.❤️
5 रुपयाला पेन आणि 3 रुपयाला refill मिळायची.
अर्थात तेव्हा ते महागच होतं.
कारण त्यावेळी 1 किंवा 2 रुपयाला पेन आणि 50 पैशाला काळी किंवा blue refill मिळायची.
Reynolds च पेन वापरणारी मुलं म्हणजे जरा वरच्या class ची असायची.
मला अजूनही आवडतं ते पेन.
आताही मिळत बहुतेक 10 रुपयाला, नक्की माहीत नाही.
मी तर sharp, rotomac ची pens सुद्धा वापरली आहेत.
तुमचे काय अनुभव पेन च्या बाबतीत??