आज काका काकूला प्रपोज करणार म्हणून बहिणीने अगदी सकाळीच ऑफिसला जायच्या आधी हॉटस्टारवर भाग पाहिला आणि म्हणून मी ही पाहिला.😆
पण आश्चर्य ,आजचा प्रपोजलचा पार्ट खरच खूप छान आहे.
ओंकार गोवर्धन आणि मधुराणी यांना या शो मध्ये मी तरी पहिल्यांदा खरे अँक्टर्स असल्यासारखे पाहिले.
डायलॉग लिहिणार्याला 100 मार्क्स
आज बहुतेक डायरेक्टरने त्या दोघांना सांगितल असाव की तुम्ही दोघांनीच एक्झिक्युट करा.
दोघांची एक्स्प्र्रेशन्स,संवादफेक,बॉडीलँग्वेज मस्त.
"नात बदलल की अपेक्षा वाढतात "किंवा नात बदलल की माणस बदलतात" हे साधे पण विचार करायला लावणारे संवाद मधुराणीने छान डिल्हिवर केले आहेत.
बटबटीत संवाद नाहीत,आक्रस्तळेपणा नाही,लाऊड बँकग्राऊंड म्युझिक नाही,कोणीतरी ऐकतय अस नाही किंवा त्यांच बोलण टिपिकल सिरियलप्रमाणे रेकॉर्ड होत आहे अस नाही.
छान सीन झाला आणि मेन म्हणजे फुल स्पेस होती दोघांना.सीन संपवलाही खूप छान.
आजचा भाग नक्की बघा.
बाकी त्याआधीचा भाग मी काही नीट पाहिला नाही,ती बावळट ईशा आणि गौरी होत्या.
हो तो सीन खरच छान आहे. दोघांनी छान execute केला.
1k