Webseries and OTT discussion thread 6- Page 30

Created

Last reply

Replies

347

Views

15.4k

Users

12

Likes

581

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: Rhrishi

प्रिया बापट आणि उमेश कामत ची 'हे काय नवीन' कोणी पाहिली आहे का?

रिव्ह्यू द्या

हो. चांगली आहे. स्टोरी वगैरे खास नाही पण दोघांची केमिस्ट्री, त्यांच्या acting साठी, हलकी फुलकी आहे.
mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

है जवानी तो इश्क होना है हा picture बघायला सुरवात केलीय. भूत बंगला आणि ह्याच्यात जास्त वाईट picture कुठला ? सांगता येणार नाही. वरुण धवन चे अचकट विचकट चाळे , मृणाल ठाकूर, पूजा हेगडे ह्यांनी कधीही तोकड्या कपड्यात नाचत सुटायचे, त्यात जिमी शेरगील villain, राजपाल यादव,मनीष पॉल ची थर्ड क्लास कॉमेडी. डायरेक्टर डेव्हिड धवन ने आपल्या मुलासाठी काढलेला पिक्चर BO वर दणकून आपटला नाही एवढंच काय त्याचं नशीब. FF करत 40 मिनिटात मी गुंडाळला. Totally avoid.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Detective Dhananjay ही मराठी सीरिज Z5 वर पहिली. आदिनाथ कोठारे मेन रोल, चिरपूटकर त्याचा असिस्टंट आहे. श्रीरंग गोडबोले यांनी बऱ्याच दिवसांनी लेखन, दिग्दर्शन केलाय. काही काही ठिकाणी फारच पोरकट वाटते. पण काय करणार मूळ कथा बाबुराव अर्नाळकर यांनी 50 वर्षापूर्वी लिहिलीय. स्टोरी मधे भरपूर loopholes आहेत. सगळ्यांची acting sincere आहे. Overall बरी आहे एकदा बघण्यासाठी. इथे हिरोईन म्हणून पायल जाधवला घेतलीय. ती आणि काय हवं मधे impressive होती. Ithe farsa scope nasla tari निभावून नेलाय. ती पुढे येईल असे वाटते.

Edited by mishkil88 - 1 months ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 1 months ago

अग आई,कहो आई सिरिज पाहिली.

सिरिज कशासाठी काढली असावी,हेच कळल नाही.म्हणजे लग्नानंतर सासू कशी सूनेला सांभाळून घेते हे दाखवण्यासाठी की सासू आणि सूनेचा बॉंड बघून सूनेची आई कशी इनसिटक्युअर होते ते दाखवण्यासाठी की आई जावयाचा बॉंड बघून मुलगी कशी फ्रस्ट्रेट होते हे दाखवण्यासाठी.

बघायची म्हणून बघितली.

कलाकारांच्यख अँक्टिंग कडे फारस लक्षच नव्हत कारण काही नव्हतच.

बर्याच ठिकाणी ह्रुता दुर्गुळे"मला काम करायचा कंटाळा आला आहे"अशा मूडमध्ये दिसली.

निर्मिती सावंतचा विग नाही आणि रेणूका शहाणे छान दिसली आहे.मला एवढच लक्षात आहे.बाकी सगळ ज्या स्पीडने पाहिल त्या स्पीडने विसरले सुध्दा.smiley36

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

मी एक वेब series आणि 2 movies पाहिले.

तीनही डोक्याच्या बाहेर आणि डोक्याची भजी करणारे आहेत.

1. Musafir cafe

काय म्हणून बनवली ही series, यात काहीच धड नाही. एक मुलगा, मुलगी असेच एकत्र राहतात, मुलीच्या ambitions खूप मोठ्या असतात, तो तिच्या साठी स्वतःची नोकरी सोडून तिच्या बरोबर settle व्हायला तयार असतो, पण तिला ते मान्य नसतं.

काही वर्षानी तो एक cafe चालवतो, त्यात त्याला अजून एक मुलगी भेटते, ते प्रेमात पडतात. पण closure कुठेच नाही.

ह्या अश्या stories कोण लिहीत?


2. बोल बोल राणी..

डोक्याच्या पार बाहेर गेला हा मूवी.

एकच कथा,पण तीन वेगवेगळ्या दृष्टीकोन. अरे पण हवेतच कशाला हे different angles? कोणी मागितले आहेत?

3. Frame.

नागराज काय बोलतो ,काहीच कळत नाही.वाघ बाबा मला आवडत नाही मुळातच.

इतके complicated movies/विषय का बनवतात आज काल?

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 1 months ago

Tumbadachi manjula zee 5 var release zala ahe.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

चुंबक ही कॉमेडी series Netflix वर 28 Aug la येतेय. Neena Gupta, Sumit raghvan etc. Sarabhai vs Sarabhai सारखी असेल असे वाटतेय.

Family business ही anil kapoor, vijay varma hyanchi corporate war ह्या विषयावर आधारित सीरिज next 1-2 महिन्यात येणार आहे.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

मी india story पाहिला.

श्रेयस तळपदे आहे, त्याची मुलगी expire झालेली औषधं, दूषित अन्न वगैरे baryach factors मुळे cancer होऊन मरते.

मग त्याची बायको आणि तो शेतकरी, फार्मा companies आणि govt या सर्वांना कोर्टात खेचतात.

अशी स्टोरी आहे.पण काही खास नाहीये.

अश्या type ची मला वाटत एक ritesh ची web series होती.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

तुंबाडची मंजुळा पहिला. फर्स्ट हाफ नुसता गोंधळ, आरडाओरड आहे. पूर्ण पिक्चर साऊथ इंडियन सिनेमाची फ्रेम to फ्रेम copy असल्याने तिकडचा आचरटपणा हुबेहूब आणण्याचा मूर्खपणा लेखक दिग्दर्शक यांनी केलाय . त्याचं जराही मराठी रूपांतर करण्याचे कष्ट घेतले नाहीत. Intervalchya आसपास सई ताम्हणकरची एन्ट्री होते मग थोडाफार सुसह्य होतो. ओम भूतकर ह्या गुणी कलाकाराला मुख्य भूमिका दिलीय. शेवट हाणामारी आणि सर्व काही गोड गोड. एकाला भूत समजून कोणीतरी जोरात ओरडणे हेच काय ते horror ani हाच काय तो इनोद 🤦. अधून मधुन सतत हेच चालू असते ते शेवटपर्यंत. खूप सारे actors घेऊन म्हणावा तितका जमला नाही. जितेंद्र जोशी, अनासपुरे वगैरे मंडळी आता वयस्कर भूमिकेत दिसायला लागली आहेत.

HydroxyGroup thumbnail
16th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

तुंबाडची मंजुळा पहिला. फर्स्ट हाफ नुसता गोंधळ, आरडाओरड आहे. पूर्ण पिक्चर साऊथ इंडियन सिनेमाची फ्रेम to फ्रेम copy असल्याने तिकडचा आचरटपणा हुबेहूब आणण्याचा मूर्खपणा लेखक दिग्दर्शक यांनी केलाय . त्याचं जराही मराठी रूपांतर करण्याचे कष्ट घेतले नाहीत. Intervalchya आसपास सई ताम्हणकरची एन्ट्री होते मग थोडाफार सुसह्य होतो. ओम भूतकर ह्या गुणी कलाकाराला मुख्य भूमिका दिलीय. शेवट हाणामारी आणि सर्व काही गोड गोड. एकाला भूत समजून कोणीतरी जोरात ओरडणे हेच काय ते horror ani हाच काय तो इनोद 🤦. अधून मधुन सतत हेच चालू असते ते शेवटपर्यंत. खूप सारे actors घेऊन म्हणावा तितका जमला नाही. जितेंद्र जोशी, अनासपुरे वगैरे मंडळी आता वयस्कर भूमिकेत दिसायला लागली आहेत.

Mi pan pahila movie. Tumhi perfect lihlay movie baddal. First half kahich bulid up nahi karat story. Kon konacha relative aahe kai challay kasha sathi challay kahich kalat nahi. Ugach don char scene daru pit basnarya lokanche dakhvat gondhal kelay nusta. Editing, dialogue department, direction, sceneplay sagalch 👎

Usha nadkarni cha 10 min cha role Dabhade madhe jara bara hota ithe kahich maja nahi ali.

Ardha vel tar asa vatat hota ki om bhutakar and ravi anna la barach kahi bolaych aahe. Pan dialogues ch lhile nahit. Ani ha asa hi cinema nahi ki fakt expressions var sagal samjhel. Time waste kela aahe fakta.

Second half jara means jara bara aahe. Ha movie nakkich theatre madhe baghnyasarkha nahi ka lokani evdha famous kela hyala

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Aarohi_2005 · 28 days ago

Tharla Tar Mag Thread 11

Hey friends this is new thread.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 1 months ago

Bai Tujha Aashirwaad Thread 1

Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Tarini: Zee Marathi Thread 2

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".