Webseries and OTT discussion thread 6 - Page 6

Created

Last reply

Replies

53

Views

2.6k

Users

6

Likes

90

Frequent Posters

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 2 days ago
#51

Zee 5 var ,devkhel navachi thriiler series ali ahe.marathi.

Aaj release zali ahe.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: a day ago
#52

देवखेळ सिरिज बघायला सुरुवात केलीक् आहे.सात एपि आहेत.पहिला झाला बघून.

स्टोरी टिपिकल आहे.

रत्नागिरीतल्या देवतर गावात शिमग्याच्या दिवशी शंखासुर नावाचा राक्षस एका पापी माणसाला मारतो आणि ही प्रथा गेले पंधरा वर्ष चालू असते.पंधरा वर्षांपूर्वी एका पोलिस अधिकार्याने सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो,पण तो अचानक गायब होतो.

आता पंधरा वर्षांनंतर एक युट्युबर त्या गावचा व्हिडीओ करत असताना,ज्या तलावात,डोहात ही प्रेत मिळाली होती त्याचाही व्हिडीओ करतो ,मग केस परत उघडली जाते.आता विशाल सरंजामे म्हणजे अंकुश चौधरीकडे ही केस आहे कारण अर्थातच तो तिथे पोलिस अधिकारी म्हणून आला आहे.त्याचा या प्रथेवर विश्वास नाही ,हे ओघाने आलच.मग आता तो सत्य शोधणार आहे.

शिमग्याच्या दिवशी त्या सरपंच,ग्रामसेवक यांच्याकडूश विरोध होतो पण तो ठाम राहतो.टण अचानक वडिल ,अरुम नलावडे जे आजारी असतात,ते फोन उचलत नाहीत म्हणून त्याला जाव लागत आणि पोलिस बंदोबस्त असूनही खून होतो.शंखासूराचा वेश घेतलेले तीन नाचत असताना त्यातल्या एकाला पळताना हा बघतो.

बाकी गावात चांगला शिक्षक विरुध्द गुंड प्रव्रुत्तीचा माणूस यांच वैर वगैरे आहेच.

हा पहिला भाग होता.

पण अतिशय सुमार,पांचट वाटला.ःःःःःःअंंकुश चौधरी केवढा म्हहणजे केवढातरी बारीक झाला आहे,क्रुश दिसतो.

पुढे बघू आता काय होत ते.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: a day ago
#53

देवखेळ सिरिज एका सिटिंगमध्ये बघितली म्हणजे राहिलेले एपिसोड्स.

म्हणजे फार एक्साईटिंग आहे म्हणून नाही,तर सस्पेन्स कोण ते आधीच कळल्याने नंतर मग बघितली नसती.

सिरिज वाईटमध्ये नाही मोडणार पण फार उत्क्रुष्ट पण नाही पण नक्की करता आली असती।

आधी प्लस पॉईंट्स-

स्टोरी टिपिकल असली कंटाळवाणी नाही.फार फाटे फोडलेले नाहीत.

महत्वाच्या कँरँक्टर्सनी मस्त काम केली आहेत.

कोकणदर्शन न घडवता जेवढ आवश्यक आहे तेवढच कोकण दाखवल आहे.

बँकग्राऊंड म्युझिक छान आहे.स्टोरीला एकदम परफेक्ट आहे.

लव्ह अँगल असूनही तो दाखवण कटाक्षाने टाळल आहे.त्याबद्दलsmiley31smiley31कारण स्टोरीला गरज नव्हती.

शिव्या शिव्या वाटतच नाही.एअ दोन डायलॉग्ज आहेत पण ओटीटीच्या रिक्वायरमेंटमध्ये बसत नाहीत.smiley36इतके मवाळ वाटतात.

शेवटी फार मेलोड्रामा नाही,लेक्चरबाजी नाही.इनफँक्ट थोडी चालली असती.

मायनस पॉईंट्स-

ज्याचा खून होतो ,ते कँरँक्टर फार एक्सप्लोअर केलेल नाही.ज्या कारणासाठी खून होतो ते बघता तो खून करणार्याने आधीच करायला हवा होता.

खूनी कोण ते इंट्रोडक्शन स्किप नाही केली तर कळत.

अंकुश चौधरी जो केस सॉल्ह करत आहे त्यालाच शेवटी कळत.smiley37

प्राजक्ता माळीने ही का केली ते कळत नाही.तिला पहिले तीन ते चार भाग डायलॉग्ज नाहीत.फेशियल एक्स्प्रेशन्स छान दिली आहेत.पण फार कामच नाही आहे.अंकुशला मात्र बघवत नाही,म्हणजे काम चांगल केल आहे पण तो इतका बारीक झाला आहे ना की बघवत नाही.तो आजारी होता का?अंगद म्हसकरपण छोट्याश्या रोलमध्ये छान.अरुण नलावडेला काही स्कोप नाही.

पण तरी बघायला हरकत नाही

आजकाल म.ट मध्ये प्रत्येकालाच चांगलच रेटिंग देतात तेवढी नक्कीच खास नाही.

पण मराठी सिरिज फार कमी येतात,म्हणून बघायची..इतकच.

Edited by RPRRR42 - a day ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: an hour ago
#54

मर्दानी 3 पाहिला.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर नाही आवडला तितका काही.

नाव movie च मर्दानी आहे, म्हणून अगदीच पुरुषसारखं वागलं, बोललं, चाललं पाहिजे का?

राणी चे ते सतत sleeves(बाह्या) व करणं, बेंच वर एक पाय ठेवून गुंडाशी बोलणं, आईला, च्याला, आई शप्पथ हे असं शिव्या देत बोलणं, काही गरजेचं नाहीये.

फर्स्ट half मला ok वाटला, पण second मध्ये आणि climax ला घाई केल्या सारखी वाटली.

अम्मा ला तर एकाच शॉट मध्ये धाडकन मारून टाकलीये.

Villain ही काही तितकासा danger वाटत नाही.

YR च्या movies मधे आजकाल villian डोईजड/ glorify होतांना दिसतो.

For eg, बंटी bubbly, धूम आणि आता मर्दानी.

माझ्या कडून 2 /5 ratings.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 2 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 2 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 7 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".