Originally posted by: iluvusakshi
थोडासा वेगळा टॉपिक...
आता अगदी विषय निघालाच आहे म्हणून..
तुमच्या पैकी किती जणांना आजी-आजोबा च सुख मिळालंय??
मला ते फारसं नाही मिळालं😢
माझ्या आई चे आई वडील, माझ्या जन्माच्या आधीच गेले होते.
आणि बाबांचे वडील मी 2 वर्षांची असतांना गेले, आणि आई मी 5 वर्षांची असताना गेली.
त्यामुळे आजी आजोबा, त्यांची माया, प्रेम हे मला लाभलंच नाही😢
(वैदेही म्हणते ना कालच्या episode मध्ये की आजी पाहिजेच, खरंच आजी आजोबा हवेतच. नातवंडाचे लाड करायला, हट्ट पुरवायला.
आई, बाबा ज्या गोष्टी साठी नको म्हणतील,पण आजी- आजोबा मात्र support करतील, गपचूप हळूच काहीतरी खाऊ/ गिफ्ट देतील..
किती मजा ना)
माझे दोन्ही आजोबा माझ्या जन्मा आधीच देवाघरी गेले. बाबांची आई मी 9 वर्षांची असताना गेली. खूप लाड करायची आमचे ती. आई ची आई कॉलेज मध्ये असताना गेली. पण तिचा सहवास जास्तं नाही मिळाला. आम्ही मामाकडे गेलो की खूप लाड करायची पण आमच्याकडे खूप कमी वेळा यायची ती. मुलीच्या घरी राहणे कमीपणाचे वाटायचे तिला...
हा एपिसोड पाहिल्यावर मी माझ्या मुलीला सांगितला की तू खूप भाग्यवान आहेस तुला दोन्ही आजी आजोबा आहेत जे तुझे खूप कोडकौतुक करतात 😊
आपले आई बाबा आज्जी आजोबा झाल्यावर किती बदलतात ना... दुधावरची साय, मुद्दल पेक्षा व्याज प्रिय असे म्हणुन आपल्या लाडाचे समर्थन करत असतात 😊 आपल्यासाठी जे strict rules होते ते नातवंडांसाठी सौम्य झालेले असतात 😄