हुश्श्य,बरेच महिन्यांनंतर वैभवीच माहेरच आडनाव कळल आणि त्याबरोबर एका सस्पेन्सचा खुलासा झाला की शशीकांतने नेमकी काय चूक केलेली असते.
त्या पुस्तकाबद्दलही कळल.वैभवी महाशब्दे,हिचे वडील म्हणजे शशीकांतचे मित्र त्यांच्याकडे शांभवीने उल्लेख केलेले ते चिन्हांचे पुस्तक असते,ज्याच्या योग्य उपयोगाने महाशब्देंची भरभराट होत असते.
पण हव्यासापोटी शशिकांत ते पुस्तक चोरतो आणि तिथून महाशब्दे कुटुंब देशोधडीला लागत.माझ्यामते वैभवी अनाथ होते आणि अपराधी पणाची भावना असल्याने शशिकांत तिला स्वतःच्या घरी आणून स्वराजशी तिच लग्न लावून देतो आणि पुढे तिचाही खून होतो.
सो,महाशब्दे कुटुंबाच्या वाताहतीला शशिकांत जबाबदार असतो, ही त्याची चूक.हा सस्पेन्स उलगडला.
पुढे कदाचित शशिकांत स्वत:त्या पुस्तकाचा गैरवापर करत असेल म्हणून सुलूमुळे त्याच्याही कुटुंबाची वाताहात होत असावी.
हे ही कळल.
पण डॉ वैभवी भूत वैभवीशी कशी जोडली गेली आहे?
ही आज्जो खरी यांची आजी आहे की यांना फक्त सांभाळल.आहे,याचा उलगडा आता मुंबईत होईल.
पण तो बिनडोक अभय तो कलश त्या घरातच ठेवून गेला.
आणि ते घर,त्यातली सुलूला त्रास देणारी ती भिंत ,शशिकांत सतत बघत असलेली ती जागा,याच गूढ नाहीच उलगडल.
केवळ23 किंवा 24भागात सगळा सस्पेन्स कसा उलगडणार आहेत हे.
टाईम बदलणार आहे का की खरच संपत आहे.
Edited by RPRRR42 - 5 years ago