मला तर हे promos सुद्धा बघवत नाही. NS ने इतके दिवस डबडी चा रोल केल्यामुळे ती आता स्मार्ट बिसिनेसवूमन च्या रोल मध्ये शोभत नाही. गो ला पुनहा मिशीवाला बायल्या घरकाम्या गडी करून टाकले आहे. ते शुभ्र आणि बबड्या हे नावे पण आता ऐकवत नाही. मुळात या सेरिलची गरजच काय होती? हि पात्रे एवढी पॉप्युलर आहेत कि यांचे विकिपीडिया पेज आहे का यांच्या जीवनात पुढे काय घडते याची लोकांना उत्सुकता आहे? नवीन चांगली कथा दाखवा, struggling ऍक्टर्स ना चान्स द्या पण नाही, उगीचच स्लॉट भरायचा, quickheal चे प्रॉडक्ट प्लेसमेंट दाखवायचे आणि या हावरट सिनिअर अक्टर्सचे खिशे भरायचे. अशाने एकदिवस लोकांचा विश्वास इतका उडणार आहे कि एखादी चांगली सिरीयल जरी आली तर ते ती बघणार नाहीत. 😭
673